IMG-20250902-WA0021

चिखली (एकनाथ माळेकर)सवणा येथे चंदनशेष क्रीडा व व्यायाम मंडळ सवणा व महात्मा गांधी मिशन वैधकीय महाविध्यालय संभाजी नगर यांच्या सयुक्त विध्यमाने दि. 2 सप्टेबंर वार मंगळवार ला मराठी पुर्व माध्यमीक शाळा सवणा येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात रक्तदान चंदनशेष क्रीडा व व्यायाम मंडळाचे सदस्य तसेच जय हनुमान भजनी मंडळ सवणा व क्रुषिवल सेंद्रीय शेती स्वय सहाय्यता गट सवणा चे सदस्य व गावातील पदमाकर भुतेकर, ज्ञानेश्वर शेळके, सादिक खा पठाण, किशोर भुतेकर, सौ नंदाबाई राम कदम, नितीन शेळके, देवानंद हावरे, राम कदम, विष्णु हावरे, गणेश हावरे, सौरभ भुतेकर, उमेश भुतेकर, कपिल भुतेकर, नंदकिशोर हाडे, परमेश्वर भुतेकर, प्रतिक करवंदे, रविद्र भुतेकर,विजय ठेंग,ज्ञानेश्वर साळोख, अरुन खडके, डाॅ प्रकाश खरात, डाॅ संजय लोखंडे, विलास खंडागळे, विजय भुतेकर, प्रफुल्ल सुरडकर, विठ्ठल थोरात, शिवा साळोख, वैभव होगे शाम थोरात, मोहन खडके, ज्ञानेश्वर चिकणे असे एकुन 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदाना साठी महात्मा गांधी मिशन महाविध्यालयाच (MGM) काॅलेज ची ब्लड बॅक संभाजीनगर ची टिम होती व तेथील डाॅ मनाली लोखंडे, देवसर, भोजने, गायकी, हे डाॅ हजर होते तसेच व चिखली चे डाॅ संजय लोखंडे, डाॅ प्रकाश खरात, डाॅ सुशिल माळेकर यांनी मदत केली.
रक्तदान यशस्वीरीत्या पार पडावे यासाठी मंडळाचे अध्यक्ष पदमाकर भुतेकर, क्रुषिवल शेतकरी गटाचे अध्यक्ष विजय भुतेकर, ज्ञानेश्वर साळोख, तसेच चंदनशेष क्रीडा मंडळ, जय हनुमान भंजनी मंडळ व क्रुषिवल सेंद्रीय शेतकरी गटातील सदस्यांनी परीश्रम घेतले. रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे. या भावनेतुन आयोजीत केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You may have missed

error: Content is protected !!