शेळगाव आटोळ येथील स्मशानभूमी रस्त्याचे काम प्रगतीपथावर
चिखली (एकनाथ माळेकर )चिखली तालुक्यातील मौजे शेळगाव आटोळ येथील ग्रामपंचायत हायकोर्टात गेली पण स्मशानभूमीसाठी रस्ता नाही केला ग्रामपंचायतची शोकांतिका स्मशान भूमी कडे रस्ता करा अन्यथा ग्रामपंचायत उघडू देणार नाही या मताळ्याखाली बुलढाणा माझानी बातमी प्रकाशित केली होती तसेच शेळगाव आटोळ येथील युवकांनी आपल्या मागणीवर ठाम असल्यामुळे स्मशानभूमी कडे जाण्याकरता रस्ताचे काम सुरू झाले आहे चार वर्षातील ग्रामपंचायतचे पहिले काम असल्याचे जनतेमध्ये चर्चा सुरू झाली आहे
चिखली तालुक्यातील मौजे शेळगाव आटोळ येथील ग्रामपंचायत मध्ये मागील चार वर्षापासून कोटी रुपयाचा निधी असूनही अनेक विकास कामे कोळंबिले आहेत. मेरा खुर्द जिल्हा परिषद मध्ये सर्वात मोठी मानल्या जाणारी ग्रामपंचायत ही शेळगाव आटोळयेथील असून या ठिकाणी बरेच विकास कामे थांबलेली आहे यामध्ये ग्रामपंचायत मधील सदस्य व त्यांच्यामधील असणारा वाद हा हायकोर्ट पर्यंत जाऊनही गावातील विकास योजना विषय मार्गी लागला नव्हता गावाच्या विकासासाठी हाच एक मुख्य अडथळा आहे असे गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

परंतु आता गावातील युवकांनी गावातील समस्यांचा भडीमार ग्रामपंचायत वरती लावलेला दिसून येतो आहे आता गावातील युवकांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला असून याचाच एक भाग म्हणून गावातील करण यंगड, शक्ती शिंदे, अशोक खर्डे, संघर्ष बोर्डे, संकेत बोर्डे, शुभम हिवाळे, विट्टल मिसाळ, पवन अंभोरे, मयूर वाघमारे,आदित्य इंगळे, सुरज निकाळजे, संदेश घेवंदे तेजस झऱ्हाडे, शुभम गावडे यांच्यासह इतर युवकांनी वैदुवाडी येथे असलेली स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता हा ग्रामपंचायत कडून तयार करून घेण्याचा निर्धार केला होता आणि आता त्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात सुद्धा झाली आहे ग्रामपंचायत शेळगाव आटोळ अंतर्गत वैदवाडी येथे असलेली स्मशानभूमी चांगल्या प्रकारे तयार आहे पण तिथे जाण्यासाठी रस्ता नव्हता तिथे कुठल्याच प्रकारची सुविधा नाही गावाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी जाण्यासाठी खूप कसरत करावी लागत होती आता स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता तयार झाला आहे ज्या युवकांनी आंदोलनाचा विषारा दिला होता त्यांच्या आंदोलनाने खऱ्या अर्थाने यश आले असल्याचे दिसून येत आहे
