ना वर्गखोली ना शिक्षक हे जिल्ह्यात चालल काय? महाविद्यालय व क्लासेस चालवण्याचं साठलोट,वर्ग खोली व शिक्षक नसतानाही चालू आहे शाळा,अधिकारी कारवाई करतील का?जनतेचे लागले लक्ष….

Screenshot_2025-09-12-08-09-54-73_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज)भारतीय शिक्षणव्यवस्था सध्या एका संक्रमणाच्या टप्प्यावर आहे. शिक्षण म्हणजे केवळ गुण मिळविण्याची शर्यत ठरू लागली आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला दुय्यम स्थान मिळत आहे. अपवादवगळता, महाविद्यालयांत मिळणाऱ्या दर्जाहीन शिक्षणामुळे कोचिंग क्लासेसची लोकप्रियता वाढत असून, या बाबीकडेही लक्ष देण्याची गरज आहे. स्पर्धा परीक्षा, प्रवेशप्रक्रिया आणि करिअरची अनिश्चितता, यामुळे पालक आणि विद्यार्थी अधिकाधिक सुरक्षित पर्याय शोधू लागले आहेत. याच गरजेतून कोचिंग क्लासेसचा प्रसार वाढत आहे. हे क्लासेस विद्यार्थी आणि पालकांची गरज बहुतांशी भागवत असल्याने प्रत्यक्ष महाविद्यालयांमध्ये जाण्याचे विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होत आहे आणि ‘डमी महाविद्यालये’ निर्माण होत आहेत.

‘डमी महाविद्यालयां’चे हे कल्चर वाढतच चालले आहे. सर्वच ठिकाणी नाही; पण बऱ्याच ठिकाणी अशा महाविद्यालयांत विद्यार्थी केवळ नावापुरते दाखल असतात. प्रत्यक्ष नोंद आहे, पण शिक्षण, वर्गखोल्या, प्रयोगशाळा दर्जेदार असेलच असे नाही. बऱ्याच ठिकाणी ते नसतेच, असा अनुभव आहे. नाते असते ते फक्त मार्कशिटपुरते!
खरे तर शिक्षक हे फक्त ज्ञान देणारे नव्हे, तर प्रेरणादाते व मार्गदर्शक असतात. पण आज शिक्षण एक व्यावसायिक मॉडेल बनले आहे. परिणामी, शिक्षण ही मूल्यनिर्मितीची प्रक्रिया राहिली नसून, ती केवळ ‘निकाल’ देणारी यंत्रणा झाली आहे. ही स्थिती केवळ विद्यार्थ्यांच्याच नव्हे, तर समाजाच्या भविष्यातील आराखड्यावरही प्रश्नचिन्ह उभे करत आहे.
या संकटातून बाहेर पडण्यासाठी शाळा, महाविद्यालये सक्षम करणे, शिक्षकांना आधार देणे आणि विद्यार्थ्यांना शालेय स्तरावरच दर्जेदार शिक्षण देणे आवश्यक आहे.
पण महाराष्ट्र राज्य शिक्षक मंडळाने वर्ग अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया चालू केली त्यामुळे जिल्ह्यात मध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी एक नव्हे तर पाच वेळा अर्ज भरावा लागला विद्यार्थ्यांची परिस्थिती नाजूक असतानाही जवळच्या शाळेत नंबर लागत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी गावापासून 30 ते 40 किलोमीटर अंतरावर ऍडमिशन घेण्यात आले मात्र ऍडमिशन घेऊनही जिल्ह्यात शिक्षण मिळत नसल्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे कारण ठरले आहे कारण ज्या ठिकाणी ऍडमिशन घेतले आहे त्या ठिकाणी ना वर्गखोली आहे ना वर्गशिक्षक शाळेतील मुख्याध्यापक म्हणतात तुम्ही आता मुलांचे क्लासेस लावा त्यामुळे पालकांवर आता संकट ओढावंल आहे जर वर्ग शिक्षक वर्ग खोलीस नसताना ऑनलाइन प्रणाली मध्ये शाळेचे नाव कसं असा प्रश्न विद्यार्थ्यासह पालकांना पडला आहे.तरी सुद्धा शिक्षण विभाग का गप्प बसलेल आहे याकडे आता विद्यार्थ्यासह पालकांचे लक्ष लागलेले आहे महाविद्यालयाचे व क्लासेसचे साठलोट होताना दिसत आहे. गटशिक्षण अधिकारी याकडे लक्ष देतील का? ज्या ठिकाणी वर्गखोली व शिक्षक नाही अशा ठिकाणी कारवाई करतील का?आता सर्व जनतेचे लक्ष लागलेलं आहे..

You may have missed

error: Content is protected !!