धनगर वस्तीचे पुनर्वसनासाठी सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन तहसीलदार अजित दिवटे सह संदीप (छोटु) पवार यांच्या भेटीने पहिल्याच दिवशी आंदोलन मागे

IMG-20250912-WA0001

सिंदखेडराजा (अनिल दराडे )येथून जवळच असलेल्या गारखेड धरण येथिल वार्ड क्रमांक ३ धनगर वस्तीचे पुनर्वसन करण्यासाठी आज ११ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या अन्नत्याग आंदोलनाला तहसिलदार अजित दिवटे सह संदीप (छोटु) पवार यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करुन आंदोलन मागे घेण्याची विनंती करून आंदोलन थांबवले आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील गारखेड धरण येथिल वार्ड क्रमांक ३ मध्ये ४० ते ५० घरांची वस्ती असून वरील बाजूस धरण असल्याने त्या धरणाच्या नदी काठावर ही वस्ती असल्यामुळे वेळोवेळी होणाऱ्या पुर परिस्थिती व रस्त्यांचा अभाव या बाबींमुळे या वस्तीतील लोकांना संघर्षमय जीवन जगावे लागत असल्याने सदर वस्तीचे पुनर्वसन करावे अशी आग्रही मागणी करत असून त्यासाठी आज रामप्रसाद लोहकरे व ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. यावेळी तहसिलदार अजित दिवटे ठाणेदार आशिष इंगळे युवा नेता संदीप (छोटु) पवार यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत मी जिल्हाधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करुन याबाबत लवकरच प्रस्ताव सादर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगून आंदोलन मागे घेण्याची विनंती करून आंदोलन थांबवले आहे. यावेळी. प्रदीप बिलोरे ,गोपिनिय विभागाचे श्रावण डोंगरे, मंडळाधिकारी गिरी, वानखेडे, पाटबंधारे उपविभाग अभियंता एन. पी. महाजन , सचिव राजेंद्र मेहेत्रे,तलाठी, संदीप इंगळे, राहूल लोहकरे, महादेव इंगळे, प्रकाश भालमोडे, विलास भिसे,गणेश राठोड, योगेश इंगळे, आकाश भिसे,राजू लोहकरे, यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!