देवखेड येथील थांबलेल्या पुलाच्या कामावरून शेतकऱ्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्या अन्यथा जलसमधी घेण्याचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्यासह शेतकऱ्यांचा इशारा….

IMG-20250913-WA0023

सिंदखेडराजा (एकनाथ माळेकर)तालुक्यातील देवखेड येथील खडक पूर्णा नदी पात्रावर पुलाचे काम अर्धवट राहिलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही तरी येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून न दिल्यास शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्यासह देवखेड येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार सिंदखेड राजा व विभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग देऊळगाव राजा यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे,
सन 2018 मध्ये तत्कालीन आमदार शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नातून विदर्भ मराठवाडा जोडण्याच्या हेतुने तसेच शेतकऱ्यांना दळणवळण करण्याच्या उद्देशाने देवखेड येथील खडकपूर्णा नदीवर पुलाचे काम मंजूर करण्यात आले होते
तेव्हापासून या पुलाचे काम सुरू आहे परंतु पुढे संबंधित कंत्राटदाराला कामाचा मोबदला न मिळाल्यामुळे पुलाचे दहा टक्के काम अपूर्ण राहिलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी थर्माकाॅलचा वापर करून शेतात जावे लागत आहे देवखेड येथील जवळपास 30 ते 35 शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नदीच्या पलीकडे आहे बरेच शेतकरी हे दोन महिन्यापासून रस्त्या अभावी शेतात गेलेले नाही त्यामुळे पुढे काढणीला आलेल्या सोयाबीन व कपाशी चे पीक शेतकऱ्यांनी कसे घरी आणावे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे तरी येत्या 20 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध न करून दिल्यास शेतकऱ्यांसह खडकपूर्णा नदी पात्रात आत्मदहन करण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी लेखी निवेदनाद्वारे तहसीलदार सिंदखेडराजा व विभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग देऊळगाव राजा यांना दिला आहे निवेदनादवर, अनिल लांडगे, काशिनाथ सरकटे ,कल्याण आढाव, अमोल पाडमुख, रेखा आढाव ,जया खरात ,यांच्यासह जवळपास 40 शेतकऱ्यांच्या सह्या आहेत

You may have missed

error: Content is protected !!