वरवंड गावासाठी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड वरवंड गावचे सरपंच बाळाभाऊ जेऊघाले यांच्या प्रयत्नातून 10 गुरांच्या गोठ्यासह 5 विहिरी मंजूर….
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज) बुलढाणा तालुक्यातील वरवंड येथे नेहमी चर्चेत असणाऱ्या व गावात विकास कामाचा धडाका लावणाऱ्या सरपंच बाळाभाऊ जेऊघाले यांनी वरवंड येथे मुख्यमंत्री पंचायतराज समृद्ध गाव या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय गायकवाड तसेच वरवंड गावचे सरपंच बाळाभाऊ जेऊघाले यांच्या प्रयत्नातून वरवंड

गावातील शेतकऱ्यांना योजनेचा सुळसुळाट चालूच असताना परत दहा गुरांचे गोट्यांची वाटप आणि पाच विहिरीची मंजुरी देण्यात आली आहे.गावात विकास कामाचा झुंजवत चालवत असतानाच त्यांनी जर गावातील शेतकऱ्यांना काही लाभ घ्यायचा असेल तर वरवंड येथील सरपंच बाळाभाऊ जेऊघाले यांनी आव्हान केलं आहे ज्या लाभार्थ्यांना गुरांच्या गोठ्यांची आवश्यकता असेल आणि सिंचन विहिरीची आवश्यकता असेल अशा लाभार्थ्यांनी तात्काळ सरपंच उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी संपर्क साधावा अशे आव्हान केले आहे.
