स्वस्थ नारी सशक्त परिववार अभियान
सिंदखेडराजा (अनिल दराडे ) दि 30 सप्टेंबर 2025 रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र आडगाव राजा येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान शिबिर आयोजित करण्यात आले आहे त्या मध्ये प्रामुख्याने महिला व बालीकाची तपासणी करण्यात येऊन .यामध्ये ANC CHECK UP ,रक्तदाब, शुगर, HB, स्तन कर्करोग , गर्भाशय कर्करोग, तोंडाचा कर्करोग ,वजन उंची, संशियत क्षय रुग्ण, संशयित कुष्ठरुग्ण व किरकोळ औषधोपचार उपचार करण्यात येणार व रुग्णांना संदर्भ सेवा देण्यात देऊन आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे अभियान शिबिर प्रसंगी मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदार संघाचे लोकाभिमुख लाडके आमदार मनोजभाऊ नंदाताई देवानंद कायंदे यांच्या हस्ते सदर अभियानाचे उद्घाटन करण्यात येणार असून सोबतच गावांमधील सरपंच, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य व सर्व कर्मचारी उपस्थित यांना उपस्थित राहण्याचे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र आडगाव चे सन्माननीय वैद्यकीय अधिकारी डॉ शिपे साहेब यांच्या वतीने करण्यात येत आहे.
