वरवंड येथे भाजपाच्या वतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवासप्ताह निमित्त रक्तदान शिबिर संपन्न
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसापासून ते महात्मा गांधी यांच्या जयंती पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा सप्ताह राबविण्यात येत आहे.या निमित्त विविध सेवा उपक्रम राबवून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गावोगावी आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या सेवारुपी शुभेच्छा देत आहेत.
या सेवा पंधरवाड्यात भाजपा कडून विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, गोसेवा, सैनिक सन्मान, यासारखे अनेक सेवा उपक्रम राबविण्यात येत आहे.
याचाच एक भाग म्हणून बुलढाणा ग्रामीण भारतीय जनता पार्टी तर्फे वरवंड येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी रक्तदात्यांनी रक्तदान करून आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सदर रक्तदान शिबिरात तालुका अध्यक्ष सतिश भाकरे पाटील, भाजपा नेते ॲड.दशरथसिंग राजपूत, माधवराव म्हस्के, दत्तात्रय जेऊघाले, सरचिटणीस सतीश देहाडराय, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल पडोळ, उपाध्यक्ष गणेश जेऊघाले, सारंगधर एकडे, राजेश पाठक, कोषाध्यक्ष शरद एकडे, भाजयुमो तालुका सचिव सागर पाटील, भाजयुमो सोशल मीडिया प्रमुख कार्तिक राजपूत, गणेश जैन, रवींद्र जेऊघाले, अशोकराव जेऊघाले, धोंडू गिरी, विजय जेऊघाले, दीपक पुरभे, गोविंद चाव्हरे, अशोक चाव्हरे, अंकुश पवार, भास्कर खेडेकर, प्रदीप जेऊघाले, निलेश पवार, अरुण चाटे, सुधीर तांगडे, छगन धंदर, भरत जेऊघाले, अमोल जेऊघाले, भागवत धंदर यांच्यासह परिसरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी व गावकरी मंडळी उपस्थित होते.
सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी जीवनधारा ब्लड बँक बुलढाणा, प्राथमिक उप आरोग्य केंद्र वरवंड यांचे सहकार्य लाभले.
