गोमास तस्करीचा पडदा फास 15 किलो गोमास जप्त आरोपी अटकेत .अंढेरा पोलिसांनी अमोना चौफुलीवर केली कारवाई…..

Screenshot_2025-09-26-19-55-57-48_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे अमोन येथे गोमासाची तस्करी अमोना चौफुली येथे 26 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे एका दुचाकीवरून गोमास वाहतूक होत असल्याचा संशय स्थानिक युवकाला आला त्यांनी संशयित्यांचा पाठलाग करून त्याला पकडले असता त्यांच्याकडे अंदाजे १५ किलो गोमास आढळले या घटनेची माहिती अंढेरा पोलीस स्टेशनला देण्यात आली ठाणेदार रुपेश शंक्करगे यांनी तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी पाठवली पोलिसांनी कारवाई करून आरोपी शेख असलम शेख साडू वय 55 राहणार बाजारपेठ जाफराबाद याला अटक केली
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी दुचाकी क्रमांक एम एच २८ झेड 1140 वरून गोमास घेऊन जात होता युवकांनी पाठलाग करून चौफुली येथे त्याला पकडण्यात आले त्यावेळी त्यांनी जनावराचे मांस असल्याचे कबूल केले पोलिसांनी ताबडतोब आरोपी अटक करून त्यांच्याकडील गोमांस गाटोवड्यातील मासाची पाहणी केली हे मास अत्यंत अस्वच्छ व बेकायदेशीरपणे वाहतूक केले जात असल्याचे आढळले या प्रकरणी अष्टविनायक देविदास मोरे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता बीएनएस 2023 मधील कलम 324 तसे महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम 1976 मधील कलम 5, 5 ही व सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढिल तपास अंढेरा पोलीस करीत आहेत

You may have missed

error: Content is protected !!