शेतीच्या वादातून किन्ही सवडद येथे मुलाने केली आई व वडिलांची हत्या…….
चिखली (अजहर शेख) चिखली तालुक्यातील किन्ही सवडत येथे घरगुती वादातून जन्मदात्या मुलाने आई- वडील दोघांनाही मारहाण करुन संपवल्याची भयंकर घटना किन्ही सवडत या गावी घडली आहे. गणेश महादेव चोपडे असे या मुलाचे नाव आहे.
या भयंनक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला आहे.सविस्तर वृत्त असे की चिखली तालुक्यातील किन्ही सवडद येथे मुलानेच आई-वडिलांची निघृण हत्या केल्याने बुलढाणा जिल्हा पुन्हा हादरला आहे. ही थरारक घटना २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली.किन्ही सवडद गावातील आरोपी गणेश महादेव चोपडे वय वर्ष (३१) याने स्वतःच्या वडिलांवर महादेव त्र्यंबक चोपडे व आई कलावतीबाई महादेव चोपडे यांच्यावर संतापाच्या भरात हल्ला केला. लाकडाने दोघांना बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दांपत्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने गावात दाखल झाले. पंचनामा करून दोन्ही मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास अमडापूर पोलीस स्टेशन करीत आहे.
