आमदार सिद्धार्थ खरात यांनी खंडाळा देवी येथे घेतले जगदंबा देवीचे दर्शन : संरक्षण भिंतीसाठी १० लक्षांचा निधी जाहीर
मेहकर ( ब्रह्मानंद वाकोडे )
दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मौजे खंडाळा देवी येथे येऊन जगदंबा मातेस साष्टांग नमस्कार करून दर्शन घेतले. या वेळी मंदिर परिसराच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या संरक्षण भिंतीबाबत ग्रामस्थ व संस्थानच्या विश्वस्त मंडळींनी आमदार खरात यांचे कडे मागणी केली. जनतेच्या भावनेची दखल घेत आमदार खरात यांनी तत्काळ प्रतिसाद देत संस्थानच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी आमदार निधीतून १० लक्ष रुपये देण्याची घोषणा केली.
दर्शनानंतर उपस्थित भाविकांना आमदारांच्या हस्ते प्रसादरूपाने साबुदाणा खिचडी व केळीचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी वातावरण भक्तिमय झाले होते.
या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मेहकर तालुका प्रमुख निंबाजी पांडव, उद्योजक संदीप गारोळे पाटील, जय जगदंबा संस्थानचे अध्यक्ष बबनभाऊ मानघाले, सचिव सुभाष मानघाले यांच्यासह श्यामराव मानघाले, प्रल्हाद मानघाले, राधेश्याम मानघाले, नेताजी मानघाले, विष्णू मानघाले, रतन मानघाले, सौ. नर्बदा मानघाले, दत्ताभाऊ मानघाले, विजय वायाळ, रवि वायाळ, संतोष अंभोरे, माजी सरपंच राजू मानघाले, लक्ष्मण पोफळघट, कुर्मदास मानघाले, रवि पोफळघट, किशोर मानघाले, किसन मानघाले, गणेश अंभोरे, गणेश ढोरे, हनुमान ढोरे, शरद मानघाले, अमृता मानघाले, अविनाश मानघाले, जगदीश मानघाले, राजू मानघाले, शंकर ढोरे, संतोष ढोरे, योगेश पोफळघट आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत
