वाघाळा येथील शेतकऱ्याची आत्महत्या तलावात आढळले प्रेत …

Screenshot_2025-10-04-21-13-56-28_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

सिंदखेडराजा (अनिल दराडे )
तालुक्यातील वाघाळा येथील 42 वर्षीय शेतकरी मारोती रतन राठोड या तरुण शेतकऱ्यांनी हनवतखेड येथील धरणात आत्महत्या केली दोन दिवसानंतर त्याचे प्रेत हनवतखेड येथील धरणात तरंगताना आढळले सविस्तर वृत्त असे की
वाघाळा येथील 42 वर्षीय शेतकरी मारुती रतन राठोड हा रात्री रोही राखण्यासाठी दररोज शेतात जायचा दिनांक 1 ऑक्टोबर रोजी हनवतखेड शिवारात असलेल्या शेतात गेला
त्यानंतर दोन दिवसांनी त्याचे प्रेत हनवतखेड च्या तलावात तरंगताना दिसले याची माहिती साखरखेर्डा पोलिसांना देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रेत तलावाच्या बाहेर काढून पंचनामा करण्यात आला मारुती राठोड यांच्याकडे त्याच्या आईच्या नावावर सहा एकर शेती होती दोघा भावांमध्ये तीन-तीन एकर शेती वाटून घेण्यात आली होती यावेळेस अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले होते हात उसने घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत मारुती घरून गेला त्यानंतर त्याचे प्रेतच आढळून आले

You may have missed

error: Content is protected !!