पेनटाकळी प्रकल्पात वरील कॅनाॅल फुटुन अनेक शेतकरयांच्या जमीनी गेल्या खरडुन….

IMG-20250627-WA0010

मेहकर ( एकनाथ माळेकर) मेहकर तालुक्यातील पेन टाकळी प्रकल्प वरून जाणार्या कॅनाॅल मुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडुन गेल्या होत्या त्यामुळे सदर कॅनाॅल चे काम होईपर्यंत पाणी सोडण्याबाबत शेतकऱ्यांनी विरोध केला होता.सदर कॅनाॅल निधी उपलब्ध झाला असून दोन महिने पासून कामं सुरू आहे.

दि.26जुन रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला व अनेक ठिकाणी कॅनाल चे काम सुरू असल्याने पाण्याचा ओह कॅनाॅल च्या बाहेर जाऊन तो फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा जमिनी खरडुन पेरणी केलेल्या पिकांचे नुकसान विहीर चे इत्यादी नुकसान झाले आहे.
सोनारगव्हाण शिवार मध्ये सावत्रा येथील शेतकरी असल्या जमीन श्रीराम निकस भागवत निकस,शिवाजी निकस,गंगाधर निकस,विलास निकस,विष्णू निकस,अमोल निकस,सतीश निकस,यश निकस, शालीग्राम निकस, मदन निकस,संतोष निकस,रुपराव निकस, यांनी पेनटाकळी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ओव्हर फ्लो चे गेट बंद असल्यामुळे हा सर्व प्रकार घडला आहे असा आरोप केला आहे.

You may have missed

error: Content is protected !!