शासनाच्या धरती आबा योजना अंतर्गत टिटवी व गोत्रा कार्यशाळेचे आयोजन आदिवासी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा – आदिवासी नेते भगवान कोकाटे

IMG-20250627-WA0026

लोणार (यासीन शेख) आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या धरती आबा योजना अंतर्गत टिटवी व गोत्रा येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत आदिवासी नेते भगवान कोकाटे हे उपस्थित होते. या कार्यशाळे दरम्यान भगवान कोकाटे यांनी उपस्थित आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. विशेषतःरेशन कार्ड,उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला,आयुष्मान भारत कार्ड आदी आवश्यक कागद पत्रांचे वाटप करण्यात आले.मत्स्य व्यवसाय विभागामार्फत मच्छीमार सहकारी संस्थेच्या सभासद व मत्स्य कास्तकार शेतकऱ्यांसाठी ९०% सबसिडीवर मोटारसायकल, सायकल, आईसबॉक्स,अ‍ॅटो रिक्षा,वातानुकूलित चारचाकी मालवाहतूक वाहन, तसेच १ हेक्टर क्षेत्रात मत्स्य संगोपन तळे व आईस फॅक्टरी उभारणी साठीच्या योजनांची माहिती देण्यात आली. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन भगवान कोकाटे यांनी उपस्थितांना केले.तसेच आदिवासी विकास विभागामार्फत काटेरी कुंपण, किराणा स्टॉल, पावर ट्रेलर, बिरसा मुंडा कृषी सिंचन विहीर यांसारख्या योजनांची माहिती देण्यात आली. या योजनांद्वारे आदिवासी युवकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील, असे मत कोकाटे यांनी व्यक्त केले.या कार्यशाळेला नायब तहसीलदार रामप्रसाद डोळे, मंडळ अधिकारी विजय पोफळे, अकोला येथील वरिष्ठ सहाय्यक आदिवासी प्रकल्प अधिकारी गोपाळ वानखेडे, निवृत्ती धोत्रे माजी सरपंच गोत्रा, ग्रामपंचायत पदाधिकारी, तलाठी ,सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यशाळेद्वारे शासनाच्या योजनांची माहिती थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश साध्य झाला असून, यामुळे आदिवासी समाजाला शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोणार तालुक्यातील टिटवी, गोत्रा,मेहकर तालुक्यातील भोसा,कणका,वाघदेव,दृग बोरी,रत्नापुर,नागेशवाडी, टेंभुरखेड,टीमटाला,जमुना या गावातील आदिवासी बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्याचे अहवान आदिवासी नेते भगवान कोकाटे यांनी केले.

You may have missed

error: Content is protected !!