आ.सौ.श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांची दिवाळी गोड…..! प्रलंबित पिक विम्याचे ३३ कोटी ६१ लाख रुपये वितरीत

IMG-20251021-WA0027

निलेश कोल्हे

चिखली:- विधानसभेच्या विकासप्रीय आमदार सौ श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नाने तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असलेली पिक विमा नुकसान भरपाईची ३३ कोटी ६१ लाख ८६ हजार ३४६ रुपये रक्कम आज मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आजपासून जमा होण्यास सुरू झाली असल्याने अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये पिक विमा उतरविलेल्या शेतकरी बांधवांना यापूर्वी आमदार सौ श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नातून १०२ कोटी ५९ लाख ७५,२८६ रुपये वितरीत करण्यात आलेले आहेत.परंतु, १३,६०५ शेतकरी बांधवांना काही तांत्रिक समस्यांमुळे पीक विमा मिळाला नव्हता. या प्रश्नावर आ सौ श्वेताताई महाले यांच्या मागणीनुसार दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्याचे कृषिमंत्री मा. ना. श्री दत्तात्रय भरणे यांच्या मंत्री दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत आ सौ श्वेताताई महाले यांची आग्रही मागणी लक्षात घेऊन मा. कृषिमंत्री व विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पिक विम्याची प्रलंबित रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. सदर प्रश्नाबाबत आ. महाले यांनी कृषिमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून चिखली मतदारसंघातील शेतकरी बांधवांना ३३,६१,८६,३४६ रुपये मिळवून दिले आहेत.आज सदर रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डिबिटीच्या माध्यमातून थेट जमा करण्यात येत आहे.यामुळे शेतकरी बांधव आनंद व्यक्त करत असून, अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत भरघोस रक्कम मिळाल्याने त्यांची दिवाळी गोड होणार आहे. आज पर्यंत चिखली मतदारसंघातील शेतकऱ्यांना आ.सौ. श्वेताताई महाले यांच्या प्रयत्नातून पीक विमा नुकसान भरपाईचे एकूण १०२ कोटी ५९ लाख ७५,२८६ कोटी लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत.


महायुती सरकार शेतकऱ्याप्रती संवेदनशील:आ.सौ.श्वेताताई महाले

दरम्यान, मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या काळात शेतकरी बांधवांना भरभरून मदत दिली जात आहे, याबद्दल सरकारचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.शेतकऱ्यांचा प्रलंबित प्रश्न वेळेवर मार्गी लावून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याचे प्रलंबित १२० कोटी रुपये वितरीत केल्याबद्द्ल आ. महाले यांनी महायुती सरकारचे मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले आहेत.

You may have missed

error: Content is protected !!