अमडापूर चिखली महामार्गावर अपघात अपघातात एकाचा मृत्यू डोंगर खंडाळा गावावर पसरली शोककळा…..
Oplus_16908288
चिखली (बुलढाणा माझा न्युज )बुलढाणा तालुक्यातील राहणारे डोंगर खंडाळा येथील विजय गिरी यांचा अपघात होऊन त्यामध्ये घटनास्थळावरच मृत्यू झाला ही घटना चिखली अमडापूर महामार्गावरील महादेव मंदिराजवळ घडली सविस्तर वृत्त अशे की
डोंगर खंडाळा येथील रहिवासी व बुलढाणा अर्बन बँकेच्या मुख्य शाखेत कार्यरत कर्मचारी विजय ओंकार गिरी यांचा अमडापूर -चिखली मार्गावर असलेल्या महादेव मंदिराजवळ भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.विजय गिरी हे MH29AA6094 क्रमांकाच्या दुचाकीने मंगळवारी दिवाळीच्या दिवशीच हिवरा आश्रमकडे जात असताना हा अपघात अमडापूरजवळील महादेव मंदिर परिसरात अज्ञात ट्रकने त्यांच्या वाहनास जोरदार धडक दिली. त्यात विजय गिरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला आहे. ही माहिती अमडापूर पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांना पडताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता पुढील तपास अमडापूर पोलीस स्टेशन करीत असून मृतक विजय गिरी यांच्या पश्चात वृद्ध वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
