वर्ग दहावी २००५ च्या बॅचचा गेट-टुगेदर विद्यार्थी स्नेह मेळावा व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न…….

IMG-20251025-WA0015

चिखली( निलेश कोल्हे)

चिखली तालुक्यातील श्री शिवाजी हायस्कूल शेलसुर सन २००५ च्या वर्ग दहावी च्या वर्ग मित्रांचा स्नेह मेळावा दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी पुरुषोत्तम काटे यांच्या शेतात स्नेह मेळावा व स्नेहभोजन कार्यक्रम संपन्न झाला. दहावी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा म्हणजे शाळा सोडल्यानंतर अनेक वर्षांनी जुने वर्गमित्र एकत्र येतात हे मेळावे भूतकाळातील आठवणींना उजाळा देतात आणि जुन्या नात्यांना पुन्हा जोडतात या मेळाव्यामध्ये माजी विद्यार्थी एकत्र येऊन विविध कार्यक्रम साजरे करणे या मेळाव्यामुळे माजी विद्यार्थी एकमेकांशी पुन्हा संपर्क साधू शकतात आणि नवीन नाती निर्माण करू शकतात स्नेह मेळावा आयोजित करण्याचा असा उद्देश असतो.


या मेळाव्यामध्ये दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थी कोणी शासकीय नोकरी, आर्मी सैनिक, महाराष्ट्र पोलीस, एस टी महामंडळ ,बँक ,कंपनी, शेती ,शासकीय कंत्राटदार सामाजिक कार्य राजकीय, असे अनेक विभागात क्षेत्रात काम करणाऱ्या वर्ग मित्रांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहिले यावेळी सर्वांनी दरवर्षी स्नेह मेळावा आयोजित करण्याचे ठरविले व जे वर्गमित्र बाहेरगावी आहेत जे संपर्कात नाही अशा वर्गमित्रांना संपर्क करून पुढील वर्षी भाऊबीज च्या दुसऱ्या दिवशी स्नेह मेळावा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याचे यावेळी ठरवण्यात आले. यावेळी धोडप, पळसखेड सपकाळ, शेलसुर, शेलोडी धोत्रा भंनगोजी येथील पुरुषोत्तम काटे,सुबोध कापसे,भाऊसाहेब कदम,सागर देशमुख,मनोहर जाधव,दत्ता गायकवाड,राहुल गायकवाड,अमोल काळे,आकाश मोहिते,अंकुश खंबाइतकर,अमोल नरवाडे,शरद कापसे,समाधान गंडे,प्रदिप कापसे, शक्तीसिंग ठाकूर,रघुनाथ शेवाळे,समाधान रिठे,सोपान घाडगे,महेश नरवाडे,नंदू पालवे,अमोल सपकाळ,रंगनाथ नरवाडे,शिवाजी मोरे,सरोज पठाण,संजय घरपाहूणे,देवानंद नेमाने,निलेश कोल्हे,गोपाल हळदे,नितीन नेमाने,लक्ष्मण कोल्हे,सागर जायगुडे, संदीप नेमाने इत्यादी वर्गमित्र स्नेह मेळावा कार्यक्रमाला उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!