आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्यावर विश्वास ठेवून मनुबाई गावचे युवकांचा भाजपमध्ये प्रवेश
चिखली( एकनाथ माळेकर )चिखली तालुक्यातील मौजे मनुबाई येथील युवक व माजी सरपंच यांनी चिखली विधानसभा मतदारसंघा चे आ श्वेता ताई महाले पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सुनील पडघान माजी सरपंच, कृष्णकुमार सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मनुबाई येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मधुकरराव वायाळ माजी सरपंच व त्यांचे
सहकारी सुखदास वायाळ रामेश्र्वर वायाळ , लक्ष्मण जाधव ,सुनील वायाळ ,कान्होबा वायाळ, प्रताप वायाळ ,अक्षय वायाळ, गणेश वायाळ मनसे ,पुरुषोत्तम वायाळ, बद्रीनाथ वायाळ, राजेंद्र वायाळ , सागर वायाळ ,भगवान इंगळे , शरद वायाळ, अमोल वायाळ, श्रीकृष्ण वायाळ, विठ्ठल वायाळ, मदन वायाळ,पवन पडघान , यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला.
