मलकापूर पांग्रा येथून शेख सत्तार बाबा सहपरिवार पवित्र उमरा यात्रेसाठी रवाना

IMG-20251116-WA0014


सिंदखेडराजा (अनिल दराडे) तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील शेख सत्तारबाबा शेख नवाज, त्यांची पत्नी शाकिरूनबी, तसेच आई हमीदाबी शेख नवाज हे मंगळवारी पवित्र मक्का मदीना उमरा यात्रेसाठी रवाना होत आहेत. इस्लाम धर्मीयांसाठी उमरा यात्रा अत्यंत पवित्र, मंगल आणि श्रद्धेचा सोहळा मानली जाते.

या शुभ प्रवासानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सत्तार बाबा यांच्या निवासस्थानासह संपूर्ण परिसरात ग्रामस्थ, नातलग आणि मान्यवरांनी भेट देत त्यांच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांच्या सुरक्षित, सुखकर आणि फलदायी यात्रेसाठी सर्वांनी मन:पूर्वक प्रार्थना व्यक्त केली. यावेळी सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले
सत्तार बाबा आणि त्यांच्या कुटुंबाची ही हज–उमरा यात्रा संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. पवित्र भूमीतून गावाचे नाव उच्चारले जाणे हे सर्व ग्रामस्थांसाठी गौरवाचे क्षण ठरत आहेत. यात्रेच्या मार्गक्रमणादरम्यान सर्वत्र त्यांना उत्स्फूर्त शुभेच्छा मिळत आहेत.
कुटुंबीयांसह गावकरीही या आध्यात्मिक प्रवासाबद्दल आनंदी व समाधानी असून, सत्तार बाबा आणि त्यांच्या परिवाराच्या सुखरूप परतीची अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे.

You may have missed

error: Content is protected !!