साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत चोराचा हैदोस शिंदीत चोरी दीड लाखाचे दागिने लंपास , लोकांमध्ये भीतीचा वातावरणअनेक ठिकाणी चोरीचा असफल प्रयत्न , वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देण्याची गरज.
सिंदखेडराजा (एकनाथ माळेकर) सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मौजे शिंदी येथे काल मध्यरात्री झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी दीड लाखाचा ऐवज लंपास केला केला आहे.प्राप्त माहितीनुसार शरद खरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून असे समजते की, दि.१७/११/२०२५ रोजी रात्री अंदाजे १० वाजताचे सुमारास त्यांचा परिवार जेवन करुन हॉलमध्ये झोपले होते. रात्रीला घरातील कोणीही व्यक्ती उठली नाही, मात्र सकाळी अंदाजे सहा ते साडेसहा वाजताचे सुमारास शरद खरात यांनी उठून पाहिले असता घराचा मागील दरवाजाची कडी तुटलेली दिसली व दरवाजा ओढुन घेतलेला होता. नंतर दुसऱ्या खोलीत गेल्यावर खोलीतील लोंखडी पत्राची कोठी ही फोडलेली दिसली व त्यामध्ये ठेवलेले कपडे मला बाहेर पडलेले दिसले. काचेची खिडकी उघडलेली दिसली. त्यानंतर मागच्या बाजुच्या दरवाजाची कडी सुध्दा तोडलेली दिसली. त्यानंतर कोठीमध्ये ठेवलेले जुने १२ वर्षापुर्वीचे सोने गहु पोत सोन्याची एक तोळ्याची किमती अंदाजे २४००० हजार रुपये, गोल मण्याची सोन्याची पोत एक तोळ्याची किमती अंदाजे २५००० हजार रुपये, एकदानी सोन्याची बारा गॅमची किमती अंदाजे २१००० हजार रुपयांची असा एकुण ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने घराच्या मागच्या दरवाजाची कडी तोडुन घरात प्रवेश करून चोरुन नेला. गावातीलच जीवन विश्वासराव खरात व अनिल भगवानराव बंगाळे यांचे सुध्दा घराच्या दरवाजाच्या कड्या तोडुन चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावरुन अज्ञात चोरट्यांविरोधातगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान सकाळी हा प्रकार उघडकीस होताच ठाणेदार गजानन करेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते, मात्र काही सुगावा लागला नाही. पुढील तपास सुरु आहे.
