अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी हाक — eKYC नसेल तर अनुदानही थांबेल!सिंदखेडराजा तहसीलदारांचा तातडीचा इशारा; उद्या तालुक्यात मोठे शिबिर

IMG-20250910-WA0013

सिंदखेडराजा (अनिल दराडे)अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसानीला सामोरे गेलेल्या सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेले अनुदान मोठ्या प्रमाणात खात्यात जमा होऊ लागले आहे. मात्र अद्याप ज्या शेतकऱ्यांची eKYC प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्यांना एक रुपयाही मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा तहसीलदार अजित दिवटे यांनी दिला आहे
सततच्या पावसाने तडाखा बसलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारी मदत सुरू आहे. पण अनेकांच्या खात्यात eKYC प्रलंबित असल्याने निधी रोखला गेला आहे.

“आपली eKYC तात्काळ पूर्ण करा; अन्यथा अनुदान प्रक्रिया थांबेल,” असे तहसीलदार दिवटे यांनी स्पष्ट आवाहन केले.
शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून उद्या
दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी
सिंदखेडराजा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर eKYC विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिराची ठिकाणे (मंडळस्तर)

तहसील कार्यालय, सिंदखेडराजा,किनगाव राजा,दुसरबीड,सोनोशी,मलकापूर पांग्रा,शेंदुर्जन,साखरखेर्डा

प्रत्येक शिबिरात CSC ऑपरेटर उपलब्ध राहणार असून, शेतकऱ्यांचे आधार पडताळणी ते eKYC अपडेट सर्व प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्यात येणार आहे.

“अनुदानापासून वंचित राहू नका!” — तहसीलदार दिवटे

“शेतकऱ्यांनी आपल्या खात्यात येणारी मदत वेळेवर मिळवण्यासाठी उद्याच्या शिबिराचा लाभ घ्यावा.
कोणत्याही eKYC पूर्ण करणे अत्यावश्यक आहे… उशीर करु नका, संधी दवडू नका,” अशी कळकळीची विनंती सिंदखेडराजा चे दबंग तहसिलदार यांनी सर्व शेतकरी यांना कळकळीचे आह्वान केले आहे

You may have missed

error: Content is protected !!