महात्मा फुले यांच्यामुळे शिक्षणाची दार खुली – विनोद सातपुते
सिंदखेडराजा(अनिल दराडे)सिंदखेडराजा तालुक्यातील उमरद ग्रामपंचायत मध्ये महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच निर्मला उबाळे होत्या, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर ग्राम विकास अधिकारी विनोद सातपुते यांनी महात्मा फुले यांच्या बद्दल विचार व्यक्त केले, यावेळी त्यांनी सांगितले की गोरगरिबांची मुलं शाळा शिकवी म्हणून, महात्मा फुले यांनी त्या काळात वाड्यावर शाळा सुरू केल्या, तसेच मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी पहिली शाळा काढली, त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला कार्यरत आहेत, आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या मुला मुलींना शिक्षण द्यावे, म्हणजेच खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी केल्याचे सार्थ होईल, यावेळी कार्यक्रमाला पंढरीनाथ उबाळे, प्रभाकर राजे जाधव, गोविंदराव मुळे, राजू शिनगारे, संतोष गिरी, मुक्ताबाई मुळे, जालिंदर गिरी, दत्तात्रय सानप, ग्रामपंचायत कर्मचारी संजय साहेबराव मुळे, देविदास खजुरे, गजानन बोडखे, यांच्यासह अनेक नागरिक हजर होते.
