रामनगर फाट्याजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार….

new-project-2025-10-15t091400518_1760499883

चिखली( एकनाथ माळेकर) अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामनगर फाट्याजवळ १ डिंसेबरच्या राञी साडेनऊ च्या सुमारास मोटारसायकल आणि चारचाकी ब्रिझा यांच्यात झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की,रामनगर येथील सुखदेव सखाराम लेंडे शिक्षक यांनी अंढेरा पोलिस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीत त्यांचा मेहुणा अंकुश बाळकृष्ण भंनगे वय ३८वर्षे हा बाॕक्सर कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम.एच.२८जे८३६९ हा रामनगर येथे येत असताना रामनगर फाट्याजवळ रस्ता क्रॉस करीत असताना देऊळगाव राजा कडुन चिखलीकडे जाणाऱ्या ब्रिझा कंपनीची गाडी क्रमांक एम.एच.१९सी तु ७४५४ च्या चालकाने भरधाव आणि निष्काळजीपणे चालवल्याने झालेल्या गंभीर अपघातात मेहुणा अंकुश बाळकृष्ण भंनगे या जागीच ठार झाला असुन सुखदेव सखाराम लेंडे यांच्या फिर्यादीवरून अंढेरा पोलिसांनी बिएन‌एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ठाणेदार रुपेश शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॕ सिध्दार्थ सोनकांबळे(दा)करीत आहे.

You may have missed

error: Content is protected !!