मेहुणा राजा शेतशिवारात गाजाची अवैध लागवड केल्याच्या प्रकरणात देऊळगाव राजा पोलिसांनी मोठी कारवाई, कारवाईत १ लाख ८५ हजार ९०० रुपयांचा गाजा जप्त…..

IMG-20251217-WA0004

सिंदखेडराजा (अनिल दराडे) पोलिस अधीक्षक नीलेश तांबे व अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.
देऊळगाव राजा पोलिस स्टेशन हद्दीतील मेहुणा पेठेल गट नंबर १२१९ मधील एका शेतात अवैध गाजाची लागवड करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक राणुकुमार पवार, अमोल दराडे, गजानन राजपूत, दिनेश बकाल, अनुप कुमार मेहेर, दिगंबर कपाटे, सतीश मुळे, युवराज राठोड, वनिता शिगणे, मंगेश सनगळे, मनोज खरडे, समाधान टेवाळे, राहुल बोर्डे आणि विलास भोसले यांच्या पथकाने १५ डिसेंबर रोजी उपरोक्त ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी आरोपी विष्णु सुकदेव बोरुडे (वय ३९ वर्ष) रा. मेहुणा यांना गावलीच्या शेतामधील गुरुत्वा पिकामध्ये ठिकठिकाणी अवैधरीत्या मादक पदार्थ असलेल्या गाजाच्या झाडांची लागवड आणि संगोपन केल्याचे पोलिसांना आढळून आले.
या कारवाईत पोलिसांनी मादक पदार्थ गाजाचे ओलसर झाडे, वजन २८ किलो ५१ ग्राम (किंमत १ लाख ८५ हजार १०० रुपये), गाजाचे सुकलेले झाडे वजन २ किलो ७०० ग्राम (किंमत १८ हजार रुपये), असे एकूण २ लाख ८५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांत भारतीय न्याय संहितेचे कलम १९ (अ) एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी व जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी देऊळगाव राजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

You may have missed

error: Content is protected !!