स्वस्त धान्य दुकानातून निकृष्ट ज्वारीचे वितरण!वरवंड येथील प्रकारः रेशनकार्डधारकांत संताप….

Screenshot_2025-12-18-17-01-12-95_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज ) शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून मिळणाऱ्या अन्नधान्याचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला असून,आता तर रेशन कार्डधारकांना थेट निकृष्ट दर्जाची ज्वारीचे वितरण होत असल्याने वरवंड परिसरात तीव्र नाराजी उसळली आहे. गव्हाऐवजी मिळणारी ही ज्वारी केवळ वासाने कुबटच नाही, तर किड्यांनी पोखरल्यामुळे ‘फुफाटा’ झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
शासन गरिबांच्या अन्नाची सोय म्हणून मोफत धान्य पुरवठा करते. मात्र, वरवंड येथील स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या ज्वारीचा दर्जा इतका निकृष्ट आहे की हे धान्य खावे की फेकून द्यावे, असा प्रश्नच नागरिकांना पडला आहे. धान्य हाताळताना किडे दिसणे, अजीब वास जाणवणे-ही दृश्ये पाहून नागरिक संतापले आहेत.
यापेक्षा चांगले भरडधान्य गुरांना दिले जाते, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. स्वस्त धान्य दुकानांतील साठवणुकीकडे दुर्लक्ष, धान्याची निगा राखण्यात झालेल्या त्रुटी आणि पुन्हा पुन्हा येणाऱ्या तक्रारींमुळे स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

बॉक्स
जिल्हा पुरवठा विभागाकडून जसे रेशन धान्य आम्हाला मिळाले, तेच रेशन कार्डधारकांना वाटप करीत आहोत.

राशन दुकानदार जेऊघाले

You may have missed

error: Content is protected !!