सिंदखेड राजा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चा झेंडा; सौरभ विजय तायडे 169 मतांनी विजयी
सिंदखेड राजा (अनिल दराडे)सिंदखेड राजा नगरपालिकेसाठी झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे उमेदवार सौरभ विजय तायडे यांनी 169 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार शाम मेहेत्रे यांचा पराभव केला.
नगरपालिकेच्या टाऊन हॉलमध्ये आज सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्याच फेरीपासून सौरभ तायडे यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे श्याम मेहेत्रे 4118 शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार आतिष तायडे यांना 3463 बसपाचे रंगनाथ खाटीकमारे यांना 129 अपक्ष दिलीप चौधरी यांना 158 अपक्ष एडवोकेट सय्यद मुबिन यांना 46 मते मिळाली हे देखील रिंगणात होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्राध्यापक संजय खडसे
यांनी विजयी उमेदवारांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी तहसीलदार अजित दिवटे, मुख्याधिकारी बोबडे, नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
प्रभागनिहाय निकाल (विजयी उमेदवार व मते)
प्रभाग 1
श्रेया उमेश खरात (NCP) – 649
संतोष प्रकाश मेहेत्रे (BJP) – 465
प्रभाग 2
कैलास नारायण मेहेत्रे (शिवसेना – शिंदे गट) – 552
सोनाली गजानन मेहेत्रे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार) – 522
प्रभाग 3
निलेश देविदास ठाकरे (NCP) – 595
सिंधू जगन ठाकरे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार) – 393
प्रभाग 4
पूजा मंगेश खुरपे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार) – 505
आवेश खान नाजीम खान (NCP) – 435
प्रभाग 5
संगीता किशोर म्हस्के (शिवसेना – शिंदे गट) – 522
कैलास नागोराव म्हस्के (NCP) – 462
प्रभाग 6
खान हाजेरा नुजहत फारूक अली खान (NCP) – 986
जासमीन अजीम तांबोळी (NCP) – 752
प्रभाग 7
गौतम प्रकाश खरात (शिवसेना – शिंदे गट) – 510
अंबिका कैलास कोरडे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार) – 435
प्रभाग 8
पोर्णिमा ओम भुसारे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार) – 490
कृष्णा माणिक मेहेत्रे (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार) – 379
प्रभाग 9
पुष्पा रामदास बारवकर (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार) – 517
दिलीप नारायण आढाव (शिवसेना – शिंदे गट) – 435
प्रभाग 10
संदीप सखाराम मेहेत्रे (शिवसेना – शिंदे गट) – 705
दिपाली योगेश मस्के (शिवसेना – शिंदे गट) – 563
पक्षीय बलाबल
शिवसेना (शिंदे गट) – 6
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – 7
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – 6
भाजपा – 1
विजयानंतर जल्लोष, शांततामय मिरवणूक
निकाल जाहीर होताच विजयी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी शांततेत मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला.
