देऊळघाट येथे चोरांचा सुळसुळाट; ग्रामस्थ त्रस्तपोलिस कारवाईअभावी भीतीचे वातावरण, नंदू लवंगे यांनी दिला आंदोलनाचा इशारा…..

IMG-20251222-WA0034

बुलडाणा (बुलढाणा माझा न्युज ) तालुक्यातील देऊळघाट गावात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून चोऱ्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असून, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरफोडी, रोख रक्कम, सोने-चांदी, शेळी व इतर जनावरे तसेच घरासमोर ठेवलेला शेतमाल व मौल्यवान वस्तू चोरट्यांनी लंपास केल्याच्या तब्बल २० ते २५ घटना घडूनही अद्याप एकाही चोरीचा छडा लागलेला नाही.
या गंभीर प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रात्री झोप न लागणे, सतत भीतीत वावरावे लागणे अशी स्थिती निर्माण झाली असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात आणखी गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
यासंदर्भात देऊळघाट येथील सर्व ग्रामस्थांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, बुलडाणा यांच्याकडे निवेदन सादर करून तात्काळ चोऱ्यांचा तपास करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. येत्या पंधरा दिवसांत आरोपींचा शोध न लागल्यास व योग्य कारवाई न झाल्यास बुलडाणा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने अमराण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. भाजप नेते नंदू जग्नाथ लवंगे व भाजप कार्यकर्ते रिझवान खान व इतर गावकरी ,इमरान खान ,भगवान हिवाळे, जग्नाथ खडखे ,अनिल भोजे . निवेदेन देतानी गावकरी उपस्थित होते .

You may have missed

error: Content is protected !!