गुरुवारी मलकापूर पांग्रा येथे मोफत सर्व रोग निदान शिबिरमलकापूर पांग्रा

IMG-20251224-WA0001

सिंदखेडराजा( अनिल दराडे) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत डॉक्टर युवराज मस्के यांचे जिजाऊ हॉस्पिटल सिंदखेडराजाच्या वतीने मलकापूर पांग्रा येथे दिनांक 25 डिसेंबरला मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर मोफत सर्व रोग निदान शिबीर आणि मोफत औषधी वाटप सकाळी अकरा वाजेपासून ते दोन वाजेपर्यंत करण्यात येणार आहे या शिबिरामध्ये हृदयरोग तज्ञ डॉक्टर युवराज म्हस्के दंत रोग तज्ञ डॉक्टर सौ किरण म्हस्के एम एस सर्जन डॉक्टर अविनाश सुरुशे अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सुभाष शिंगणे आदी तज्ञ डॉक्टर तपासणी करून उपचार करणार आहे
या शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन जिजाऊ हॉस्पिटल च्या वतीने डॉ युवराज म्हस्के यांनी केले आहे

You may have missed

error: Content is protected !!