अंढेरा शाखेत गणेश छबिले यांचा मनःपूर्वक सत्कार; महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या सेवेला नवे बळ

IMG-20250704-WA0003

दे/राजा एकनाथ माळेकर देवळगाव राजा तालुक्यातील मौजे अंढेरा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत नवनियुक्त शाखा व्यवस्थापक म्हणून गणेश विलासराव छबिले यांनी दिनांक २३ जून २०२५ रोजी पदभार स्वीकारला. त्यांच्या स्वागतार्थ अंढेरा यातील सर्व पत्रकार बांधवांनी संयुक्तपणे मनःपूर्वक सत्कार केला. यावेळी बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

पूर्वी या शाखेत कार्यरत असलेले व्यवस्थापक विनायक सुधाकर वेदपाठक यांची बदली अंबड शाखेत झाली असून, त्यांच्या जागी गणेश छबिले यांची नियुक्ती झाली आहे. पत्रकारांनी त्यांच्या नव्या कार्यकाळाच्या शुभेच्छा देत अंढेरा परिसरातील शेतकरी, बचत गट, छोटे व्यावसायिक व गोरगरीब नागरिकांना पारदर्शक व तत्पर सेवा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
उल्लेखनीय बाब म्हणजे, दिनांक १ मे २०२५ पासून ‘विदर्भ कोकण ग्रामीण बँक’ चे नामांतर ‘महाराष्ट्र ग्रामीण बँक’ असे करण्यात आले असून, त्या अनुषंगानेही बँकेच्या कामकाजाला नवचैतन्य लाभले आहे.
सत्कार कार्यक्रमावेळी बँकेचे अधिकारी गौरव पुरुषोत्तम महाळे, गंगा अंकुश घुले, रोकोपाल, तसेच संदेश वाहक जगदीश दगडोबा तेजनकर उपस्थित होते. याशिवाय देवानंद बेल्ट, पत्रकार हनीफ शेख आणि नंदकिशोर देशमुख यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय ठरली.
नवीन शाखा व्यवस्थापक गणेश छबिले यांनी या सत्काराबद्दल आभार मानले आणि सांगितले की, “अंढेरा परिसरातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, बचत गट व ग्राहक यांना योग्य मार्गदर्शन व जलद सेवा देणे हे माझे प्राधान्य राहील. बँकेचा प्रत्येक ग्राहक हा माझ्यासाठी कुटुंबासारखा आहे.”
कार्यक्रम अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला आणि स्थानिक पातळीवर बँक व समाज यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

You may have missed

error: Content is protected !!