किनगावराजा पोलिस स्टेशन येथे दोघा विरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल.

IMG-20251227-WA0010

सिंदखेडराजा ( अनिल दराडे)किनगावराजा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात दिनांक 23 डिसेंबर रोजी एका अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी अतिप्रसंग केल्याने पोस्को कायद्याअंतर्गत 24 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुलीची आई वय 35 यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर मुलगी वय 11 वर्ष दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरासमोर एकटी झाडझुड करत होती ,त्या वेळी घराशेजारी राहणारे अल्पवयीन दोघे मुले वय 14 वर्ष व 15 वर्ष तिच्या घरी गेले त्या पैकी एकाने मुलीवर लैंगिक अत्याचार केला असून दुसरा घरा समोर पहारा देत होता .ह्या अतिप्रसंगामुळे मुलीला वेदना होऊ लागल्याने पीडित मुलीने माझ्या दोन्ही मांड्याच्या मध्ये दुखत आहे असे आईस सांगितले ,यावरून आईला शंका आली परत मुलीला सर्व काही खरे सांग असे म्हटल्यावर पीडित मुलीने सर्व प्रकार कथन केला ,या सर्व प्रकाराची मुलीच्या आईने पोलिस स्टेशन किनगावराजा येथे तक्रार दाखल केली त्या नुसार पोलिसांनी अप.नंबर 354/2025कलम 64 (2)(i)65 (2),351 (3) 3 (5)BNS सह कलम 4.6. 17 पोक्सो नुसार किनगाव राजा पोलिस स्टेशन येथे दोन अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार संजय मातोंडकर करत आहेत .

You may have missed

error: Content is protected !!