पोलीस स्थापना दिनानिमित्ताने ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बिबी ( जयजीत आडे ) 8 जानेवारी रोजी बीबी येथील सहकार विद्या मंदिर शाळेत बीबी पोलीस स्टेशनचे थानेदार चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी विद्यार्थ्यांना कायदा विषयी माहिती देऊन त्यांचे अनुपालन सर्वांनीच करावे विद्यार्थ्यांना शालेय जीवन जगताना शिस्तही फार महत्त्वाची असून त्याचे पालनानेच मोठा माणूस बनत असतो हे सांगताना रोड सेफ्टी रूल्स चे सर्वांनीच पालन करावे.अठरा वर्षाच्या आतील मुलांनी मोटर बाईक चालू नये तो कायद्याने गुन्हा असून त्यामुळे कोण कोणती काळजी घ्यावी. त्याचबरोबर मोबाईलचा वापर करताना आक्षेपार्य लिंकमुळे पालकांची खूप मोठी नुकसान होऊ शकते.त्यामुळे मोबाईलचा वापर खूप काळजीपूर्वक करावे. असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सचिन खरात सर व उपमुख्याध्यापक आर जी राठोड सर सह शाळेचे शिक्षक शिक्षिकावृंद उपस्थित होते.
