वैष्णवगडावर डॉ प्रदीप हुसे यांनी सपत्नीक केली विठ्ठल रुख्मिमाई ची महापूजा….
सिंदखेड राजा (अनिल दराडे )मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळ खुट्टा या गावच्या डोंगरावर ह. भ. प. सानप महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वसलेल्या वैष्णव गडावर आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुख्मिमाई ची महापूजा करण्याचा मान मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथील रहिवासी आणि जालना येथील हुसे हॉस्पिटल चे संचालक डॉ प्रदीप हुसे व त्यांच्या सुविध्य पत्नी डॉ. अंजली हुसे यांच्या हस्ते सकाळी महा पूजा करण्यात आली
यावेळी त्यांच्या सोबत त्यांची मुलं पीयूष व पद्मनाभ यांच्या सह
श्री उमेशचंद्र हूशे सहाय्यक उप निबंधक,डॉ राजेंद्र हुशे, खुशालराव नागरे,डॉ शिवानंद जायभाये, डॉ विलास खुरपे,संजय सांगळे आदी उपस्थित होते. आज वैष्णव गडावर दिवस भर परिसरातून आलेल्या दिंड्या , भगवी पताका टाळ मुरडुंग वाजवत जय हरी विठल चा जयघोष करत वैष्णव गड भक्तांनी अक्षरश फुलून गेला होता . ह .भ. प. सानप महाराज यांनी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथून जवळच असलेल्या सावखेड तेजन फाट्यापासून पिंपळ खुट्टा या गावच्या डोंगरावर म्हणजेच वैष्णव गडावर प्रति पंढरपूर निर्माण केले आहे दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने या वैष्णव गडावर हजारो वारकरी भक्त गन उपस्थित राहून पांडुरंग चरणी लीन होतात.
सिंदखेड राजा येथून रामेश्वर मंदिर समिती ने रामेश्वर मंदिर ते वैष्णव गड अशी शेकडो वारकऱ्यांची पायी वतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते
यावेळी वैष्णव गडाचे तीर्थ क्षेत्राचे संचालक यांच्या पिंपळ खुट्टा, उगला, जळगाव, पिंपळ गाव बू यासह परिसरातील शेकडो स्वंयसेवक यांनी यावेळी भक्तांची व्यवस्था केली.
सिंदखेड राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार इंगळे व पोलिस उपनिरीक्षक सानप व इतर सर्व पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त केला होता या प्रसंगी सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी वैष्णव गडावर येऊन विठ्ठल रुख्मिमाई चे दर्शन घेतले दिवसभर वैष्णव गडावर हजारो भक्तांचा जनसागर उसळला होता
