शाहू-फुले-आंबेडकर चळवळीच्या बहुजन नेत्या डॉ.वनश्री ऊर्मिला श्रीकृष्णराव ठाकरे यांना “राज्यस्तरीय बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार” प्रदान
खामगाव (बुलढाणा माझा न्युज )खामगाव स्थित जिल्हा बुलढाणा येथील शाहू फुले, आंबेडकर चळवळीच्या बहुजन नेत्या ज्येष्ठ समाजसेविका तथा साहित्यिका, समीक्षक, प्रबोधनकार डॉ.वनश्री ऊर्मिला श्रीकृष्णराव ठाकरे यांना “राज्यस्तरीय बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार -२०२५” नुकताच प्रदान करण्यात आला.ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम,सुलोचना महिला आश्रम,लताई अनाथलंय, भोकर ता चिखली च्या वतीने आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त व बहुजन नायक युगपुरुष मान्यवर कांशीरामजी यांच्या स्मृतिप्रित्यार्थ दि.०६-०७-२०२५ रोजी रविवारला श्री शिवाजी सिनियर कॉलेज चिखली येथे सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आलेल्या सन्मान समारंभ सोहळ्यात उद्घाटक मनोज दांडगे राष्ट्रवादी नेते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. साहेबराव सिरसाठ बहुजन विचारवंत, प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाई कैलास सुखदाने विदर्भ अध्यक्ष भीमशक्ती, प्रा. डॉ. सुभाष राऊत, कुणाल पैठणकर बामसेफ, प्रताप भांबळे अध्यक्ष संत कबीर पत संस्था, तर प्रमुख उपस्थितीत विकी शिनगारे अध्यक्ष फुले आंबेडकर जयंती उत्सव समिती, राजेश गवई बामसेफ, जय सियाराम त्रिदल संघ माजी सैनिक संघटना,विजय खिल्लारे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर पत संस्था मेहकर, एस. एस.गवई अध्यक्ष संबोधी ग्रुप, नितीन फुलझाडे,अध्यक्ष, तालुका पत्रकार संघ चिखली,दिपक मोरे पत्रकार,प्रताप मोरे पत्रकार,हिम्मतवंत जाधव दैनिक सम्राट, बाळू भिसे वंचित शहर अध्यक्ष आदि मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. ऊर्मिला ठाकरे यांना “राज्यस्तरीय बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍडव्होकेट सी.पी.इंगळे यांनी केले.
डॉ.वनश्री ऊर्मिला ठाकरे गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून बहुजन समाजासाठी विशेषतः अनु जाती, जमाती, भटक्या,
विमुक्त जाती,मनोदुर्बल,
अंध,अपंग,कुष्ठरोगी,विधवा,परित्यक्ता,देवदासी, तृतीयपंथी यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्याचे शैक्षणिक,” सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.अन्याय अत्याचार निर्मुलन, अंधश्रद्धा निर्मुलन, हुंडाबंदी, व्यसनमुक्ती जन जागरण यासारखे कार्यक्रम घेऊन आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळून देतं आहेत.
विधवा परित्यक्ता, देवदासी, तृतीयपंथी यांनाही माणूस म्हणून वागणूक मिळावी यासाठी प्रबोधन करून लोकांमध्ये जनजागृतीसाठी चे कार्य करित आहेत.
त्यांची दहा पुस्तके प्रकाशित झालेली आहे.
‘ज्ञानसंस्कार ग्रंथ’, ‘दैनंदिन शालेय परिपाठ’, ‘ऊर्मी’ काव्यसंग्रह, ‘माझ्यात मी’, ‘जोडी तुझी माझी’, ‘संघर्षातील ऊर्मी’, ‘वळून बघतांना’,’माह्या पोरगं इंग्लिश शिकते’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ आदी .. त्यांची साहित्यसंपदा आहे. तसेच त्यांनी “साहसी विजय”, “छोटा जादुगार” या बालचित्रपटात व “सण्डे को शुट है” या टेलिफिल्म मध्ये अभिनेत्री म्हणूनही काम केलेले आहे.
संचलन प्रशांत डोंगरदिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन ऍड.सी.पी.इंगळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंजी. एन. के. सरदार, सतीश पैठणे, मनोज जाधव, रघुनाथ गवई, राजेंद्र सुरडकर, पत्रकार विजय खरात, गणेश श्रीवास्तव, दयानंद निकाळजे, यांनी अथक परिश्रम घेतले.
