नियमांना डावलून खापरखेड रेती घाटावरून रेतीची अवैध वाहतूक…

Screenshot_2026-02-11-14-44-32-50_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

दुसरबीड( अवेज पठाण)११ फेब्रुवारी येथून जवळच असलेल्या लोणार तालुक्यातील खापरखेड येथील रेती घाटावरून सर्व नियमांना डावलून पोकलैंड च्या सह्याने रेतीचे अवैध उत्खनन सुरू महसूल विभागाची बध्याची भूमिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह*या बाबत सविस्तर असे की लोणार तालुक्यातील खापरखेड रेती घाटावर पोखलँड ( एल आर) च्या साह्याने रेतीचे उत्खनन होत असून संबंधित ठेकेदार व त्यांचे भागीदार यांची वाहने वाहतूक पास न घेता रेतीची अवैध वाहतूक करत आहे हा सर्व प्रकार दिवसाढवळ्या सुरू असताना महसूल विभाग केवळ बघण्याची भूमिका घेत असल्याने हा सर्व प्रकार महसूल अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगम मताने सुरू असल्याचे बोलले जात आहे पोकलेन च्या साह्याने दिवस रात्र रेतीचे उत्खनन होत असल्याने नदीमध्ये मोठ मोठाले गड्डे पडलेले आहे शासकीय नियमाचे काटेकोर पालन करून संबंधित ठेकेदाराने रेतीचे उत्खनन करावे असे स्पष्ट आदेश असताना ठेकेदाराने महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून अवैध प्रकारे उत्खनन सुरू केले आहे प्रस्तावित गटाच्या व्यतिरिक्त ठेकेदाराने इतर गटातून रेतीचे अवैध प्रमाणे मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेले आहे. *प्रस्तावित गटातून किती रेती काढली याचे मोजमाप व्हावे**प्रस्तावित गटाच्या व्यतिरिक्त अन्य गटातून जे उत्खनन झाले आहे त्याचे मोजमाप होऊन ठेकेदारावर दंडात्मक कारवाई व्हावी**नियमबाह्य उत्खनन केल्याप्रकरणी ठेकेदारास ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे**१० टन क्षमतेच्या रस्त्यावरून ५० टनाची वाहतूक*मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत किनगाव जट्टू खापरखेड दरम्यान सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे सदर रस्त्याची क्षमता दहा टना पेक्षा कमी ची असताना या रस्त्यावरून 40 ते 50 टनाचे रेतीचे टिप्पर सर्रास भरधाव वेगाने वाहतूक करतात त्यामुळे सदर रस्ता हा एक ते दोन महिन्यांमध्ये उध्वस्त होऊन नामशेष होण्याच्या मार्गावर आहे बांधकाम विभागाने या गंभीर बाबीकडे तत्काळ लक्ष देऊन या रस्त्यावरील रेतीची अवजड वाहने बंद कारवी तसेच ठेकेदाराने पर्यायी रस्ता उपलब्ध करून घ्यावा अशी *नौशाद शेख माज़ी उपसरपंच दूसरबीड़ यानी महसूल आयुक्त अमरावती याना दिलेल्या निवेदनात केली आहे

You may have missed

error: Content is protected !!