breaking news चिखली बुलढाणा रोडवर अपघाताची मालिका सुरूच ट्रकने युवकाला चिरडले
निलेश कोल्हे
चिखली:-12 फेब्रुवारी : चिखली मार्गावर हातणी जवळ एका भरधाव ट्रकचा आणि टू व्हीलर चा मोठा अपघात झाला. सकाळी सव्वा नऊ वाजेच्या दरम्यान झालेल्या अपघातात टू व्हीलर वर स्वार असलेला युवक जागीच चिरडला गेला. सदर युवक हा एकलारा येथील असल्याचे समजते. तो परीक्षेला जात असताना त्याच्यावर काळाने झडप घातली हा अपघात इतका भीषण होता की मृतकाचे अक्षरशः दोन तुकडे. झाले.मृतक तरुणाचे नाव शंतनू नारायण अंभोरे (वय 23) असल्याचे कळते. घटनास्थळावर पीएसआय गाढे आपल्या पथकासह दाखल झालेल्या आहेत. प्रेत उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा सामान्य रुग्णालय चिखली येथे पाठवण्यात आले आहे. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास चिखली पोलीस स्टेशन करीत आहे
