भूमि अभिलेख विभागाचे कामकाज पडले ठप्प आजपासून राज्यातील सर्व कर्मचारी गेले संपावर
सिंदखेड राजा ( अनिल दराडे )भूमि अभिलेख कार्यालय सिंदखेडराजा आणि भूमि अभिलेख कार्यालय देऊळगाव राजा यांनी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना दिले निवेदन* सिंदखेडराजा अनिल दराडे *भूमि अभिलेख कार्यालय सिंदखेडराजा आणि भूमि अभिलेख कार्यालय देऊळगाव राजा येथील सर्व कर्मचारी संपात सहभागी* भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात आजपासून महाराष्ट्रातील सर्व भूमि अभिलेख विभागातील कर्मचारी संपावर गेले आहेत, त्यामुळे या संपाचा महाराष्ट्रातील भूमि अभिलेख विभागाशी संबंधित कामावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडल्याचे आज दिवसभरात दिसून आले. भूमि अभिलेख च्या इतिहासात राज्यातील सर्व भूमि अभिलेख चे कर्मचारी भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य च्या एकाच छताखाली आले असून यातून कर्मचाऱ्यांची ताकद एकटवल्याचे दिसून येत आहे. भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक हे विभागाचे कणा मानले जातात. जमिनीची मोजणी करण्यापासून ते शासकीय दस्तऐवज अद्ययावत ठेवण्यापर्यंत त्यांची कामे अत्यंत तांत्रिक आणि महत्त्वाची असतात.भुकरमापक पदाची शैक्षणिक पात्रता ही अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका करण्यात आली असून या विभागातील सर्व कामे हे तांत्रिक स्वरूपाचीच आहेत. इतर विभागातील खासकरून वन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील भुकरमापक पदांवरील कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतन देण्यात येत असून भुमिअभिलेख विभागांमध्ये मात्र कर्मचाऱ्यांना हे लिपिक वर्गीय वेतन देण्यात येत आहे. मा. न्याधिकरणाने (मॅट ) सुद्धा या कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल देऊन ही शासनाने अजूनही या कर्मचाऱ्यांना तांत्रिक वेतनश्रेणी लागू केली नाही, त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.
कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची रूपरेषा जाहीर केली असून ती पुढीलप्रमाणे,
१८ फेब्रुवारी 2026 रोजी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत,
२० फेब्रुवारी 2026 पासून मोजणी काम बंद २३ ते २६ फेब्रुवारीदरम्यान सामूहिक रजा
२७ फेब्रुवारी रोजी पुण्यात जमाबंदी आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे .मागण्या मान्य न झाल्यास २ मार्चपासून संपूर्ण राज्यात बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.आज निवेदन देताना भूमि अभिलेख कार्यालय सिंदखेडराजा आणि भूमि अभिलेख कार्यालय देऊळगाव राजा येथील कर्मचारी उपस्थित होते. भूमि अभिलेख कार्यालय सिंदखेडराजा चे मुख्यालय सहायक मारोती थोरवे, गोपाल वाघमारे, श्रीकांत बुलबुले, सुनिता खडसे, प्रकाश शिंदे तसेच भूमि अभिलेख कार्यालय देऊळगाव राजा कार्यालयाचे भुमापक रमेश शिंदे, राजेंद्र गहेराव उपस्थित होते.
