पोलीस स्टेशन किनगाव राजा येथे शांतता समिती बैठक; जातीय सलोखा राखण्याचे आवाहन ठाणेदार मातोंडकर

Screenshot_2026-02-25-08-11-10-62_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

सिंदखेडराजा (अनिल दराडे) दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पोलीस स्टेशन किनगाव राजा येथे सायंकाळी ७.०० ते ८.२५ या वेळेत पोलीस स्टेशन बीबी हद्दीतील चिखला काकड गावातील जातीय तणावाच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती व जातीय सलोखा बैठक घेण्यात आली. बैठकीस पोलीस अधिकारी, गावातील मान्यवर, नागरिक तसेच पत्रकार मंडळी उपस्थित होती.बैठकीत नागरिकांना मार्गदर्शन करताना पुढील मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला —जातीपेक्षा गावातील शांती, एकोपा व सौहार्द अधिक महत्त्वाचा असल्याचे समजावण्यात आले.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे सोशल मीडिया स्टेटस किंवा पोस्ट टाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले.कोणाच्याही धार्मिक भावना दुखावतील अशा पोस्ट किंवा भडकावू भाषण करू नये, असे स्पष्ट करण्यात आले.काही अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.कोणत्याही महापुरुषांचा अवैधरित्या पुतळा स्थापन करू नये, अशी सूचना देण्यात आली.धार्मिक कार्यक्रम घेण्यापूर्वी पोलिसांना आगाऊ माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.गावातील किशोरवयीन मुलांवर पालकांनी विशेष लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले.बैठकीच्या शेवटी नागरिकांना गावात जातीय सलोखा व शांतता कायम राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली असून परिसरात पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.

You may have missed

error: Content is protected !!