सिंदखेडराजा येथे स्वयंसिद्धा महिला मंचतर्फे अभिनव पालक कार्यशाळा संपन्न

Screenshot_2026-03-11-21-20-16-67_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

शहर प्रतिनिधी : रवि ढवळे

सिंदखेडराजा : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्वयंसिद्धा महिला मंचतर्फे अभिनव पालक कार्यशाळेचे आयोजन १० मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता सावता भवन येथे करण्यात आले, ज्यामध्ये संवाद सेतू प्रतिष्ठान, संभाजीनगरच्या सौ. अर्चना नरसापूर व सौ. अनघा महाजन प्रमुख वक्त्यांप्रमाणे उपस्थित होत्या आणि त्यांनी पालक-मुलांमधील नातेसंबंध, मुलांशी संवाद आणि योग्य काळजी यावर उपयुक्त मार्गदर्शन केले; यासोबतच कार्यक्रमात त्या विषयावर आधारित लघुनाटिका सादर करण्यात आली तर सौ. शुभांगी मगर यांनी “नाते आई व मुलीचे” ही कविता वाचून श्रोत्यांकडून उत्स्फूर्त दाद मिळवली, प्रास्तावना डॉ. सौ. रजनी म्हस्के यांनी केली तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. शुभांगी मगर व सौ. कविता मिनासे यांनी केले, तसेच उपस्थित महिलांसाठी मनोरंजक खेळांचे आयोजन सौ. अरुणा चौधरी, सौ. सारिका मेहेत्रे व सौ. सविता गाणार यांनी घेतले, कार्यक्रमाची प्रसिद्धी व मीडिया पब्लिसिटी सौ. सोनाली खरात व डॉ. सौ. मंजुश्री खुरपे यांनी केली आणि आभार प्रदर्शन सौ. प्रतिभा तायडे यांनी केले; सुमारे तीन तास चाललेल्या या अभिनव पालक कार्यशाळेचा उपस्थित महिला व मुलींना निश्चितच मोठा फायदा होईल, असा विश्वास स्वयंसिद्धा महिला मंचच्या सदस्यांनी व्यक्त केला.

You may have missed

error: Content is protected !!