डॉ करीम शेख यांना ‘पीएचडी’ प्रदान; सोनोशी गावासह सिंदखेड राजा तालुक्याचे नाव उंचावले
बिबी प्रतिनिधी :- जयजित आङे
सोनोशी (ता. सिंदखेड राजा):
येथील रहिवासी डॉ.करीम शेख यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या वतीने समाजकार्य (Social Work) या विषयात नुकतीच ‘विद्यावाचस्पती’ (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली आहे.
त्यांनी यापूर्वी समाजकार्य (MSW) आणि मराठी या दोन्ही विषयांत ‘नेट’ (NET) आणि ‘सेट’ (SET) सारख्या अत्यंत कठीण राष्ट्रीय व राज्यस्तरीय पात्रता परीक्षा उत्तीर्ण करून आपले शैक्षणिक प्रभुत्व सिद्ध केले आहे. त्यांच्या या यशाने सोनोशी गावासह संपूर्ण सिंदखेड राजा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डॉ.करिम शेख हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी जालना येथे वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक या पदावर कार्यरत आहे
त्यांच्या या यशाचे श्रेय त्यांनी आपले मार्गदर्शक, आई-वडील, संपूर्ण परिवार आणि संपूर्ण मित्रपरिवाराला दिले आहे. त्यांच्या या विशेष कामगिरीबद्दल सोनोशी व सिंदखेड राजा परिसरातील विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
