समृद्धी महामार्गावरील लोखंडी जाळी चोरीप्रकरणी तिघे जेरबंद; दोन लाखांचा मुद्देमाल जप्तमनसे तालूका अध्यक्षांचा सामावेश…
सिंदखेडराजा (अनिल दराडे ) समृद्धी महामार्गालगत बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या व अँगलची चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना किनगाव राजा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २ मार्च २०२६ रोजी किनगाव राजा पोस्ट परिसरातील समृद्धी महामार्गालगत बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या व अँगल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी किनगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा शोध घेत असताना सिंदखेड राजा मनसेचे तालुका अध्यक्ष अभि देशमुख, विलास दुंडियार (रा. दुसरबीड) व देवानंद डोईफोडे (रा. केशव शिवणे) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरीची कबुली दिल्याचे समोर आले.या कारवाईदरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेल्या लोखंडी जाळ्या व अँगलसह अंदाजे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले टाटा एस (छोटा हत्ती) वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल सध्या जालना येथील चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या ताब्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून किनगाव राजा हद्दीतील समुध्दीसह राज्य महामार्गावरील रस्त्याचे अनेक ठिकाणांवर जाळी चोरी झाल्याच्या तक्रारी असून या चोर्या मध्ये मनसे या राजकीय पक्षाचा तालूका अध्यक्ष असल्याने या चोरट्यांंना राजकीय पाठबळ असल्याने आतापर्यंत किती चोर्या सदर आरोपींनी केल्या याबाबत पोलीस कसून तपास करीत असून ही कारवाई पोलीस हवालदार विष्णू मुंढे, पोलीस कॉन्स्टेबल जीवन जयभाये आणि गणेश वारकरी यांनी केली असून प्रकरणाचा पुढील तपास किनगाव राजा पोलीस करत आहेत.
