मासरूळ येथे २३ वर्षांनंतर रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा​शाळेला पुस्तके भेट देऊन जपली सामाजिक बांधिलकी; ‘आठवणींची साठवण’ पुस्तकाचेही प्रकाशन​….

0
Screenshot_2026-04-08-18-38-42-39_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

मासरूळ ( बुलढाणा माझा न्युज ):तालुक्यातील मासरूळ येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये सन २००२-०३ च्या १० वीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २३ वर्षांनंतर एकत्र येत ‘स्नेहमिलन सोहळा’ अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात साजरा केला. केवळ गेट-टुगेदर न करता या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला पुस्तके भेट देऊन सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.​या सोहळ्याचे औचित्य साधून माजी विद्यार्थी श्री. विनोद जाधव यांनी शालेय जीवनावर आधारित लिहिलेल्या ‘आठवणींची साठवण’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुजनांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला, ज्यामुळे अनेक जण भावुक झाले होते.​एक दिवसाची भरली शाळातब्बल २३ वर्षांनंतर मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने शाळेच्या आवारात पुन्हा एकदा बालपण अवतरले होते. विद्यार्थ्यांनी विविध खेळांचा आनंद लुटला. विशेष म्हणजे, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून सर्वांनी भोजनानंतर शिरखुर्माचा आस्वाद घेतला. भविष्यात सर्व मित्र-मैत्रिणींनी एकमेकांच्या सुख-दुःखात खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.​गुरुजनांचा सन्मानविद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत प्रत्येक शिक्षकाला स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. या कार्यक्रमाला शिक्षक श्री. गोरे सर, श्री. सरोदे सर, श्री. पायघन सर, श्री. तायडे सर, श्री. जामनिक सर, श्री. म्हस्के सर, श्री. आळेकर सर, श्री. सोनुने सर तसेच देविदास साळवे व २००२-०३ बॅचचे सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!