केशव शिवणी दुसरबीड मंडळातच ठेवा, साखरखेर्ड्यात नकोच!” ग्रामपंचायतीचे तहसीलदारांना खरमरीत पत्र…

0
Screenshot_2026-04-11-18-05-29-59_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

सिंदखेडराजा (अनिल दराडे ) गट ग्रामपंचायत केशव शिवणीने तहसीलदारांवर निशाणा साधला आहे. “केशव शिवणी गाव नवीन उपविभाग साखरखेर्डात टाकू नका, दुसरबीड मंडळातच समाविष्ट करा” अशी ठाम भूमिका घेत सरपंच व्ही. एस. आंधळे यांनी 10 एप्रिल रोजी खरमरीत पत्र दिले.केशव शिवणी गाव सध्या मलकापूर मंडळात आहे. मात्र भौगोलिकदृष्ट्या हे गाव दुसरबीड मंडळाला लागून आहे. शासकीय कामकाज आणि दैनंदिन ये-जा करण्यासाठी सिंदखेडराजा तहसील नागरिकांना जवळ व सोयीची आहेसरपंचांनी पत्रात स्पष्ट इशारा दिला आहे की, कोणत्याही परिस्थितीत गाव साखरखेर्डा उपविभाग व अप्पर तहसील कार्यालयात टाकण्यात येऊ नये. गाव दुसरबीड मंडळात समाविष्ट केल्यास नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहे.*नागरिकांची भूमिका*गाव जर साखरखेर्ड्यात गेले तर शासकीय कामासाठी नागरिकांना मोठी पायपीट करावी लागेल. त्यामुळे ग्रामपंचायतीने वेळीच आवाज उठवत प्रशासनाला इशारा दिला आहे.आता तहसील प्रशासन काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण केशव शिवणी गावाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!