महाजल योजनेचा बोजवारा, टाकीला गळती, पाईपलाईन बोगस मधुकर शिंदे याचा उपोषणाचा इशारा

0
Screenshot_2026-04-15-17-24-53-25_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

सिंदखेडराजा (अनिल दराडे ) जलजीवन मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्चून राबवलेल्या महाजल योजनेचे पळसखेड चवका येथे तीन तेरा वाजले आहेत. संतप्त झालेल्या मधुकर किसन शिंदे यांनी थेट कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग यांना तक्रार अर्ज देऊन भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला आहे.10 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या अर्जात शिंदे म्हणतात, गावात बांधलेली पाण्याची टाकी पूर्णपणे नादुरुस्त आहे. सिमेंटचे कोन वापरल्याने टाकीला मोठी गळती लागली आहे. पाणीच थांबत नाही. शिवारात भरपूर पाणी असताना विहीर मात्र चुकीच्या ठिकाणी, खडकावर खोदली. त्यामुळे तीही निरुपयोगी ठरली.गावासाठी 7 किलोमीटर पाईप लाईन मंजूर होती, पण ती बोगस टाकण्यात आली. एकाच नालीमध्ये दोन गावांचे पाईप टाकल्याचा धक्कादायक आरोप शिंदे यांनी केला आहे. पाईप कोणत्या कंपनीचे, किती खोलीचे टाकले याचे इस्टिमेंट मागवले आहे.शिंदे यांनी थेट इशारा दिला की, ठेकेदाराची सखोल चौकशी करून त्याचे नाव काळ्या यादीत टाका. कोणतेही बिल अदा करू नका. बिल अदा केल्यास आपले कार्यालय जबाबदार राहील आणि कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जाईल. जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत धडकहा तक्रार अर्ज जलसंधारण मंत्री मुंबई, आमदार मनोजभाऊ कायंदे आणि जिल्हाधिकारी बुलढाणा यांनाही पाठवण्यात आला आहे.महाजल योजनेच्या नावाखाली सुरू असलेल्या या कारभारावर प्रशासन काय कारवाई करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!