राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराने राजेश नागरे व विनोद सातपुते सन्मानित…

0
IMG-20260426-WA0021

सिंदखेडराजा( अनिल दराडे )किनगाव जट्टू आश्रय आशा फाउंडेशन मालेगाव च्या वतीने दिनांक 25 एप्रिल रोजी हरिकेश लॉन्स मालेगाव जिल्हा नाशिक येथे राजेश नागरे व विनोद सातपुते राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले किनगाव जट्टू येथील फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे अध्यक्ष राजेश नागरे व ग्राम विकास अधिकारी विनोद सातपुते गेल्या कित्येक वर्षापासून त्यांनी गावात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत त्याची दखल घेत पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्षस्थानी आश्रय आशा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आयपीएस प्रतापराव दिघावकर आय पी एस दर्शन दुगड सहायक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ बारवाल फाउंडेशनचे उपाध्यक्ष राजेंद्र पवार सचिव श्रीमती आशाताई (अलका) बच्छाव हे होते कार्यक्रमाला बहुसंख्येने मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!