धर्मवीर’ संजू भाऊंच्या समर्थनार्थ ‘छावा’ मैदानात; पुस्तकातील ‘शिवाजी’ उल्लेखावरून आक्रमक पवित्रा….
सिंदखेडराजा (अनिल दराडे )आमदार संजू भाऊ गायकवाड यांच्या वक्तव्यावरून उठलेल्या वादळात आता ‘छावा’ संघटनेने उडी घेतली आहे. धर्मवीर आमदार संजू भाऊ गायकवाड यांच्या समर्थनार्थ छावा संघटना रस्त्यावर उतरणार असून आज मातोश्री सिंदखेडराजा गेस्ट हाऊस येथे जिल्हा पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.*बैठकीला ‘हे’ दिग्गज हजर*या बैठकीला जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव, गोविंद टेके, कृष्णा कोल्हे, संतोष राजे जाधव, बाळासाहेब शेळके, संजय उगले, संभाजी नन्नवरे व सामाजिक कार्यकर्ते विजू भाऊ घोंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. *’पुढील रणनीती लवकरच’ – छावाचा इशारा*बैठकीनंतर संघटनेने आक्रमक भूमिका घेतली. “पुढील रणनीती लवकरच जाहीर करू,” असा इशारा छावा संघटनेने दिला आहे. *’बोलण्याची पद्धत चुकली असेल, पण…’*संघटनेने स्पष्ट केले की, “संजू भाऊ गायकवाड यांच्या बोलण्याची पद्धत चुकली असेल, पण विरोधकांनी संधीचा फायदा घेत त्यावरून वाद घालत बसण्यापेक्षा बदल केला तर बरं होईल.”*’पुस्तकात ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख का?’*छावा संघटनेने थेट पुस्तकांवरच बोट ठेवले. “पुस्तकात वारंवार ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केला आहे. ते वाचतानाही वाईट वाटते. प्रत्येक ठिकाणी महाराजांचं नाव आदराने घ्यावे, अशी शिवप्रेमींची भावना आहे. त्याचा आदर करून बदल करण्यात यावा, अन्यथा बंदी घालण्यात यावी. काहीच हरकत नाही,” अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली.शिवरायांच्या नावाचा सन्मान राखला जावा, यासाठी छावा संघटना आता आक्रमक होणार असल्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहेत
