निष्ठेचा कळस! साहेबांसाठी छातीत कळ असतानाही बारामती गाठली; बुद्धू चौधरी यांचा त्याग पाहून कार्यकर्ते भारावले…

0
IMG-20260426-WA0019

सिंदखेडराजा (अनिल दराडे)”नेता असावा तर असा, ज्याच्यासाठी कार्यकर्ता जीव ओवाळून टाकेल!” ही उक्ती सिंदखेडराजा तालुक्यात ॲड. नाझेर काझी यांच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरतेय. साहेबांना आमदार करण्याच्या ध्येयाने पेटलेल्या बुद्धू चौधरी या निष्ठावान कार्यकर्त्याने छातीत वेदना सुरू असतानाही बारामतीचा प्रवास केला आणि निष्ठेचा नवा आदर्श घालून दिला.*काय घडलं?*काही दिवसांपूर्वी बुद्धू चौधरी यांना छातीत वेदना जाणवू लागल्या. डॉक्टरांनी तातडीने अँजिओग्राफीचा सल्ला दिला. अशा वेळी कुणीही आधी तब्येतीला प्राधान्य देईल. पण चौधरी यांनी ॲड. नाझेर काझी साहेबांवरील प्रेमापोटी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीला जाणाऱ्या शिष्टमंडळात ते छातीत कळ सोसत सहभागी झाले. “साहेब आमदार झालेलं पाहायचंय, मग हा त्रास काय चीज आहे?” ही भावना त्यामागे होती.*नेतृत्वाने कमावलेला ठेवा*”जीवाची पर्वा न करता नेत्यासाठी पुढे सरसावणारा कार्यकर्ता हाच खरा ठेवा असतो. ॲड. नाझेर काझी साहेबांनी आपल्या कामातून आणि माणुसकीतून अशीच जीवाला जीव देणारी फळी उभी केली आहे,” अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे.आजच्या स्वार्थी राजकारणात अशी निष्ठा दुर्मीळच. पण काझी साहेबांच्या बाबतीत ती रक्तात भिनली आहे. कार्यकर्त्यांचे हे प्रेम आणि विश्वास हीच त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद आहे.*तब्येत ‘ठणठणीत’*दरम्यान, आज सकाळी जालना येथे अँजिओग्राफी करून सर्व तपासण्या पूर्ण केल्या असून तब्येत चांगली असल्याची भावना बुद्धू चौधरी यांनी व्यक्त केली. “साहेबांचे आशीर्वाद आहेत, आता जोमाने कामाला लागू,” असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.बुद्धू चौधरी यांची ही कृती एक संदेश देऊन गेली – नेत्याने मनं जिंकली की कार्यकर्ते जीव ओवाळून टाकायलाही मागेपुढे पाहत नाहीत. आणि अशाच नात्यांवर खरं नेतृत्व उभं राहतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!