भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या जिल्हा सचिवपदी शेख कदीर शेख शब्बीर यांची नियुक्ती…
निलेश कोल्हे
चिखली : भारतीय जनता पार्टी, प्रदेश अध्यक्ष व बुलढाणा जिल्हा यांच्या मान्यतेने तसेच चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार विकास कन्या आदरनिय सौ.श्वैताताई महाले पाटील यांच्या सुचनेनुसार भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शेख. सलीम शेख.याकूब यांनी किन्होळा येथिल तंटामुक्ती अध्यक्ष तथा जन कल्याण समाज उन्नती पत्रकार संघटनेचे चिखली तालुका अध्यक्ष शेख.कदीर शेख.शब्बीर यांची भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे बुलढाणा जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.सदर नियुक्ती हि भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शेख.सलीम शेख.याकूब यांनी दि.२५ एप्रिल २०२६ रोजी एका पत्रकाद्वारे केली सदर नियुक्तीचे पत्र देतेवेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष मा.आ.विजयराजजी शिंदे साहेब चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ.श्वेताताई महाले पाटील,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय गाडेकर, भाजपा बुलढाणा शहराध्यक्ष मंदार बाहेकर ,भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शेख.सलीम शेख.याकूब, रहीमभाई ,जाकीर भाई, इरफान पठाण,आसिम पठाण,यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच या नियुक्तीबाबत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शेख.कदीर शेख . शब्बीर यांनी सामाजिक, राजकीय व पत्रकार या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा व कार्यक्षमतेचा लाभ पक्ष संघटन वाढीसाठी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.नियुक्तीनंतर शेख.कदीरभाई यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचे सांगितले.त्यांच्या नियुक्तीबद्दल कार्यकर्ते व समर्थकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
