जिल्हा परिषद शाळेला गावकऱ्यांनी लावले कुलूप……!
चिखली(निलेश कोल्हे) जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारी मुले हे गोर गरीबाची असतात, जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी शिकले पाहिजेत, कारण आज जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला विद्यार्थी हे उद्या देशाचे भविष्य आहे, शासन सर्व शिक्षा अभियान जाहिरातीवर कोट्यावधी रुपये खर्च करते ,तर दुसरीकडे जिल्हा परिषद बुलढाणा व पंचायत समिती चिखली यांच्या हलगर्जीपणा व नियोजन शून्य कारभारामुळे, सुरू असलेली इसोली येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा बंद पाडण्यासाठी हालचाली सुरू आहेत,असं इसोली गावामध्ये दिसून येत आहे.इसोली जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये एक ते चार अशा चार तुकड्या आहेत, सध्या विद्यार्थ्यांची पटसंख्या १०१ आहे, ऑनलाइन पोर्टलवर आधार लिंक असलेले ९१विद्यार्थी आहेत, सध्या जिल्हा परिषद इसोली शाळेवर चार कार्यरत शिक्षक आहेत, त्यामुळे १०१विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी चार तुकड्या असल्यामुळे चार शिक्षकांची आवश्यकता आहे. व हे आतापर्यंत सुरळीत चालू आहे. यावर्षी गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन गावांमध्ये ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी बाहेरगावी जाऊन शिक्षण घेतात, परंतु जिल्हा परिषद शाळा वाचली पाहिजे म्हणून इसोली गावकऱ्यांनी, शाळा समितीने व गावातील काही नवख्या तरुणांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी म्हणून व गरीबाची जिल्हा परिषद शाळा वाचावी म्हणून, गावांमध्ये गेल्या महिना भरापासून फिरून जनजागृती करत गावातली मुलं गावातल्या शाळेत शिकवा व गावातली जिल्हा परिषद शाळा वाचवा… ही मोहीम हाती घेतली. परंतु बुलढाणा जिल्हा परिषद प्रशासन शिक्षण विभाग, व चिखली पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या कुठेतरी चुकीच्या धोरणामुळे, मनमानी कारभारा मुळे सुरू असलेली ईसोली जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या हालचालीला वेग आणत १०१ विद्यार्थ्यांसाठी चार शिक्षकांची आवश्यकता असताना दोन शिक्षक अतिरिक्त दाखवून त्यांचे समायोजन करण्याचा घाट घातला. चार शिक्षकातून दोन शिक्षकांच्या बदली करण्याचा आदेश काढण्यात आला, मग दोन शिक्षक चार वर्ग कसे सांभाळणार, काही गावांमध्ये पाच विद्यार्थी संख्या असताना दोन शिक्षक, तर इसोली मध्ये १०१ विद्यार्थी संख्या असताना दोन शिक्षक मग दोन शिक्षक चार वर्ग कसे सांभाळतील, खरंच मुलांना न्याय देऊ शकतील का? व विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसानास कोण जबाबदार, असा तीव्र संताप व्यक्त करत गावकरी, पालक व इसोली जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती यांच्या तीव्र संताप शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता जिल्हा परिषद शाळेला पालकांनी कुलूप लावत जर जिल्हा परिषद शाळा बंद पाडायची असेल तर,मग शाळा उघडायची कशाला…. आम्ही स्वतः कुलूप लावतो, असा निर्धार करत इसोली जिल्हा परिषद शाळेला गावकऱ्यांनी कुलूप लावून,आपला संताप व्यक्त करत, जोपर्यंत इसोली जिल्हा परिषद शाळेची समायोजन प्रक्रिया थांबत नाही, तोपर्यंत आम्ही शाळा उघडत नाही, व विद्यार्थ्यांनाही शाळेत पाठवत नाही, असा निर्धार करत कुलूप लावले.
