सिंदखेडराजा तालुक्यात अवैध रेती उत्खननाचा हैदोस ; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह – मनोज जाधव

0

सिंदखेडराजा( बुलढाणा माझा न्यूज ) तालुक्यातील विविध नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. दुसर बीड, ताडशिवनी, हिवरखेड पूर्णा तसेच सिंदखेडराजा परिसरातील काही घाटांवर पोकलँड मशीन व हायवा वाहनांच्या साहाय्याने दिवस-रात्र रेती उपसा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काही घाटांवर शासनाने मंजूर केलेल्या मर्यादेपेक्षा कित्येक पटीने अधिक रेती उत्खनन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात मशीनद्वारे उत्खनन होत असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच भूजल पातळीवरही याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी रात्रीच्या वेळीही रेती वाहतूक सुरू असून मोठ्या प्रमाणात हायवा वाहनांची ये-जा होत आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.दरम्यान, या प्रकरणी महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात असून, अवैध उत्खननाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का? अशी चर्चा परिसरात सुरू आहे.संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून अवैध रेती उत्खनन तात्काळ बंद करावे, दोषींवर फौजदारी कारवाई करावी तसेच उत्खननासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री व वाहने जप्त करावीत, अशी मागणी मनोज जाधव यांनी केली आहे.कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला असून त्यामुळे प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!