बकरी ईद शांततेत साजरी करा!’ किनगावराजा पोलिसांचा शांतता समिती बैठकीतून नागरिकांना आवाहन.’कुर्बानीसाठी केवळ निर्धारित जागा वापरा, शासनाचे सर्व नियम पाळा’ – सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय मातोडकर यांचे स्पष्ट निर्देश…

0
IMG-20260527-WA0002

सिंदखेडराजा( अनिल दराडे) आगामी बकरी ईद सण शांततेत आणि धार्मिक सौहार्दाने साजरा व्हावा, यासाठी किनगावराजा पोलिस स्टेशनच्या वतीने *शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक दि. २६ मे रोजी सायंकाळी पोलिस स्टेशनच्या परिसरात पार पडली. बैठकीला पोलिस पाटील, पत्रकार, मुस्लिम समाजातील मान्यवर नागरिक तसेच विविध क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.बैठकीत सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय मातोडकर यांनी नागरिकांना आवाहन केले की, कुर्बानीसाठी केवळ निर्धारित ठिकाणाचा वापर करावा. कुठेही उघड्यावर अवशेष किंवा मांस सार्वजनिक ठिकाणी टाकू नये. परिसर स्वच्छ ठेवावा आणि कोणत्याही प्रकारची गैरसोय झाल्यास तातडीने पोलिसांना कळवावे. याशिवाय धार्मिक कार्यक्रम नियोजित वेळेतच पूर्ण करावेत तसेच सामाजिक ऐक्य अबाधित ठेवून सण उत्साहात साजरा करावा, असेही त्यांनी सांगितले.बकरी ईद हा सण सर्वांनी एकत्र येऊन शांततेत साजरा करावा, यासाठी ही बैठक घेण्यात आली. शांतता समितीच्या या बैठकीमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश गेला असून, सण शांततेत पार पाडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!